मोटारसायकलसह पुलावरून कोसळून तरुण ठार
मोटारसायकलसह पुलावरून कोसळून तरुण ठार
लेवाजगत न्यूज धुळे-साक्री तालुक्यातील महूमाळ रस्त्यावर भरधाव मोटारसायकल पुलावरून खाली कोसळल्यामुळे तरुण ठार झाला. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महूमाळ रस्त्यावरून जाणारी मोटारसायकल (एमएच ३९, ए - एच ४९२०) ही भरधाव वेगात होती. वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे मोटारसायकल चालकासह पुलावरून खाली जाऊन कोसळला. या घटनेत मोटारसायकल चालक विजय साजऱ्या गावित (वय ३३, रा खोकसे, ता. नवापूर, जि. नंदुरबार) हा ठार झाला. सकाळी हा प्रकार समोर आला. याप्रकरणी मृत विजय याचे वडील साजऱ्या फुलजी गावित (वय ६६) यांच्या माहितीवरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत