अंकुरित धान्य सेवन योग्य का अयोग्य -डॉ सुशांत पाटील
अंकुरित धान्य सेवन योग्य का अयोग्य -डॉ सुशांत पाटील
हिरवे मूग, चणे, मटकी, गहू या सारख्या धान्यांना पाण्यात भिजवून ओल्या कपड्यात बांधून ठेवतात . अंकुरित झाल्यावर वेगवेगळे व्यंजन या पासून बनविले जातात . कुणी कुणी तर नाश्ता म्हणून कच्चे देखील खात असतो तर कुणी भाजी बनवून मुख्य आहार म्हणून घेत असतो . धाब्या पासून पाच तारांकित हॉटेल पर्यंत गरीबाच्या झोपडी पासून श्रीमंतांच्या बंगल्या पर्यंत अंकुरित धान्याने बनविलेले व्यंजन लोक रुची घेऊन खातात.
पण कुणी कधी या अंकुरित धान्याच्या खाद्य उपयोगिता बद्दल विचार केला आहे का ?
आधुनिक आहारशास्त्र तज्ञ अंकुरित धान्य खाण्याचे सल्ले देतात. म्हणजेच आता आपण विचार करत असाल की अंकुरित धान्य खाणे हे हितावह आहे , बरोबर ना ?
पण आयुर्वेद शास्त्र अंकुरित धान्याबद्दल काय म्हणते ते आपण कधी जाणून घेतले आहे का ?
आधुनिक आहार शास्त्र विश्वात उत्पन्न झालेले प्रत्येक आहार द्रव्य (foodstuff) प्रोटीन , कार्बोहायड्रेट, फॅट या दृष्टिकोनातून पहाते , तर आयुर्वेद शास्त्र आहारद्रव्याचे पांचभौतिक संरचना आधारावर मूल्यांकन करते . एकाच आहार द्रव्याकरिता दोघे शास्त्र जमीन आसमानाचे फरक सांगू शकतात हे आपल्याला कळले असेल च .
आधुनिक आहार शास्त्रानुसार -
1 ) अंकुरित धान्यात कार्बोहायड्रेट ची मात्रा प्रोटीन पेक्षा कमी असते , ज्यामुळे हे पचायला हलके होते .
2) अंकुरित धान्यात पोषकांश अधिक असतो .
3) अंकुरित धान्यात असलेले पोषकांश शारीरिक घटकात लवकर मिसळून जातात .
4) अंकुरित धान्य रक्त शर्करा नियमन करतात .
परंतु आयुर्वेदात या विरुद्ध मत मांडलेले आहे . महर्षी चरकाचार्य यांनी चरक संहिता नावाच्या आपल्या ग्रंथात चिकित्सा संगण्यापूर्वी रासायनाधिकार नावाच्या अध्यायात अंकुरित धान्याचे सेवन निषिद्ध असल्याचे सांगितलेले आहे . अंकुरित धान्याला आयुर्वेदात ग्राम्य आहार (junk food) म्हटलेले आहे . असा आहार केल्याने शरीरात तिन्ही दोषांचा प्रकोप होतो . शरीराच्या मांसपेशी ढिल्या पडतात . संधी विकृती उत्पन्न होते . रक्तात विदाह उत्पन्न होतो , अस्थी, मेद, शुक्र धातूच्या विकृती उत्पन्न होतात . शरीर ओजहीन तथा रोगांचे अधिष्ठान बनते .
आयुर्वेद प्रत्येक आहार द्रव्यातील पांचभौतिक संरचनेला त्या आहार द्रव्याच्या कर्मांचा सिद्धांत मानला आहे . या परिपेक्ष येथे अंकुरित धान्याला सुद्धा हा सिद्धांत लागू होतो . बीज जो पर्यंत बीज आहे तो पर्यंत बिजाची पांचभौतिक संरचना मानवदेह पोषणास लागू पडते . या मुळे कोणतेही खाद्य बीज खाल्याने वर सांगितलेले अपाय मानव देहाला होत नाहीत . बीज माणसाला सेवन करण्यासाठी च बनविले आहे . पण जेव्हा या बिजात अंकुरण चालू होते तेंव्हा त्याची संरचना नवीन अंकुराच्या पोषणासाठी युक्त होऊन जाते . या साठी अंकुरण पश्चात कोणतेच बीज मनुष्याला हितकर नाही .
आता तुम्ही विचार करत असाल की मी तर अनेक वर्षे लोटली अंकुरित धान्य खातोय पण मला अजून काही झाले नाही ?
आता ही तुमची गोष्ट पण खरीच आहे . कारण जे प्रत्यक्ष दिसते आहे ते शास्त्र विरोधात आहे . परंतु आपण सिगारेट विडी पिणारे अनेक लोक पाहतो ते लोक रोज सिगारेट / पीत असतात म्हणून काही त्यांना संध्याकाळी च कॅन्सर होत नाही . कॅन्सर होतो पण त्याला थोडा काळ जावा लागतो . या गोष्टीत च तुमचे उत्तर लपलेले आहे . कुठलाही सेंद्रिय असात्म्य आहार एका निश्चित मारक स्तरावर पोहोचे पर्यंत घातक ठरत नाही . या बाबीला आयुर्वेदात दुषीविष अर्थात slow poision म्हटलेले आहे . अंकुरित धान्याहार सुद्धा याच वर्गात मोडतो . समाजात एखादा सर्व्हे केल्यास अंकुरित धान्याला healthy food समजून खाणाऱ्या लोकांत तुम्हाला बीपी डायबिटीज, पांढरे डाग , अचानक केस झडणे, नजर कमजोर होणे , अचानक पूर्ण शरीरात खाज येणे , कमी वयात च म्हातारे दिसणे , विस्मरण या प्रकारच्या समस्या दिसून येतील .
अंकुरित धान्य , पिझा, बर्गर सारखे ग्राम्य आहार खाण्याने जे दुष्परिणाम होतात त्यावर आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने पंचकर्म करून घेऊन हे पदार्थ सेवन न करण्याची प्रतिज्ञा करावी , किमान ज्यांना वरील लक्षणे उत्पन्न झालेली आहेत त्यांनी हे पदार्थ खाणे टाळले च पाहिजे .
डॉ सुशांत शशिकांत पाटील
विद्यानगर, फैजपूर
9860431004
(दर रविवारी सावदा येथे , दर गुरुवारी रावेर येथे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत