Header Ads

Header ADS

मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याने बाजूला केले-खडसे यांचा गौप्यस्फोट

 मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याने बाजूला केले-खडसे यांचा गौप्यस्फोट

लेवाजगत न्यूज पिंपरी चिंचवड - मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्यानेच मला बाजूला करण्यात आले , असा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला . 

      खडसे यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला . पिंपरी - चिंचवडमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर प्रहार केला . वापरा आणि फेकून द्या हे भाजपाचे धोरण असल्याचा टोलाही खडसे यांनी यावेळी लगावला. भाजपासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी आपले उभे आयुष्य घातले . पण ते आज कुठे आहेत ? असा सवालही त्यांनी केला.मराठवाडा , कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतील मुख्यमंत्री झाले . पण ७० वर्षाच्या राजकीय जीवनात खान्देशचा मुख्यमंत्री झाला नाही.मात्र खान्देशचा एखादा माणूस त्या पदापर्यंत पोहचत असताना त्याला मुख्यमंत्री होवून दिले नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली . पिंपरी - चिंचवड पालिकेतील स्थायी समितीचा अध्यक्ष लाच घेतो.तो कोणाच्या आदेशाने लाच घेत होता . पक्षाच्या वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय त्याची अशी हिंम्मत होणार नाही . त्यामुळे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी या महानगरपालिकेत झालेला भ्रष्टाचार विधानसभेत मांडावा असे आव्हान दिले . भ्रष्टाचार झाला तर हे आपल्या पदाधिकाऱ्याची चौकशीची मागणी करत नाहीत . मात्र इतरांकडे ते बोट दाखवतात . भ्रष्ट्राचाराच्या विरोधात लढायचे असेल तर त्यांच्या चौकशीची मागणी केली पाहिजे , असेही खडसे यावेळी म्हणाले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.