Header Ads

Header ADS

देहविक्री करणाऱ्या दोन महिलांसह लॉज चालकावर कारवाई

 


देहविक्री करणाऱ्या दोन महिलांसह लॉज चालकावर कारवाई

प्रतिनिधी जळगाव-एमआयडीसी परिसरातील अमरनाथ लॉज येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सोमवारी रात्री या लॉजवर छापा मारला असता दोन महिला, दोन पुरुष आढळून आले. या प्रकरणी लॉज चालकासह दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

    शंकर दुलाराम महाजन (वय ४१, रा. हनुमाननगर) याच्या विरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६चे कलम ५ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. महाजन याने नरेंद्र तोताराम शर्मा (रा. अयोध्यानगर) यांच्याकडून लॉज भाड्याने घेतली आहे. लॉजवर देहविक्री सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यानुसार परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक आशिद कांबळे यांच्यासह पथकाने छापा मारला. या वेळी तेथे दोन महिलांसोबत राजेश मिठाराम ठोंबरे (वय ४९, रा. ज्ञानदेवनगर) व विकास रमेश सोनवणे (वय २७, रा. रामेश्वर कॉलनी) हे दोन पुरुष मिळून आले. शंकर महाजन हा एक हजार रुपये घेऊन लॉजमधील खोली व महिला उपलब्ध करून देत असल्याची माहिती या पुरुषांनी दिली. त्यानुसार लॉजचालक महाजनसह दोन्ही महिलांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात कारवाई करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.