Header Ads

Header ADS

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ऑनलाइन होणार

 


जिल्हास्तरीय लोकशाही दिन ऑनलाइन होणार

 लेवाजगत न्यूज जळगाव- नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. कोरोनाच्या संसर्गामुळे ऑनलाइन लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता दूरचित्रवाणी परिषदेद्वारे लोकशाही दिन होईल. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच ७ रोजीच लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणांबाबत आढावा बैठक होईल. जिल्ह्यातील संबंधित विभाग आपल्या अधिपत्याखालील विभागांचा प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन व त्याबाबतचा निपटारा करून या दिवशी आवश्यक त्या अहवालासह सकाळी ११ वाजेच्या सुमारास उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.