धुळ्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
धुळ्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
वृत्त संस्था - धुळे शहरापासून जवळ असलेल्या अवधान येथे एकाच वेळी एकाच कुटुंबातील पाच जणांनी विषारी द्रव औषध प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. सोमवारी हा प्रकार घडला. कारण अद्याप समोर आले नसून, एकाची प्रकृती गंभीर आहे.
शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील गणेश गोपाळ व त्यांचे कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी धुळ्यात आले होते. अवधान येथे ते खोली भाड्याने घेऊन राहत होते. गणेश (वय ३६) यांच्यासोबत पत्नी सविता (वय ३४), मुलगी जयश्री (वय १४), मुलगा गोविंद (वय १२) हा होता. या कुटुंबाकडे भरत पारधी (वय २६) हा आला होता. सोमवारी सायंकाळी या कुटुंबाने विष प्राशन केले. त्यानंतर घरमालकाला आम्ही विष प्राशन केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे घरमालक व इतरांनी तातडीने पाचही जणांना हिरे रुग्णालयात दाखल केले. शिवाय पोलिसांना कळवले. काही वेळातच मोहाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहायक उपनिरीक्षक अशोक पायमोडे, प्रकाश जाधव व पथक दाखल झाले. पाच जणांपैकी भरतची प्रकृती गंभीर आहे.
कारण अस्पष्ट
एकाच वेळी विष प्राशन केले. घटनेचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. याबाबत त्यांच्या नातलगांकडे विचारणा केली जाणार आहे. मंगळवारी त्यांचे जबाब नोंदवले जातील, अशी माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत