Contact Banner

शिवजयंती निमीत्त मोफत सुकट भाकर डे साजरा

 


शिवजयंती निमीत्त मोफत सुकट भाकर डे साजरा

उरण (सुनिल ठाकूर),सामान्य कुटूंब ते खव्वयांचा आवडता न्याहरीचा बेत म्हणजे  सुकट भाकरी आणि ती जर आगरी पध्दतीची असेल तर त्याची मजा काही औरच. हीच सुकट भाकरी अनेकांचे गरिबांचे न्याहरीद्वारे वेळेवर पोट सुध्दा भरते. शिवजयंतीचे निमीत्त साधत कशेळी येथील दर्यादारी हॉटेल ने याच पदार्थाला घेऊन ‘आयुष्यभर जनतेच्या भाकरीचा विचार करणाऱ्या राजाच्या जयंती निमीत्त मोफत सुकट भाकरी डे’ चे आयोजन केले होते. नवीमुंबईतील उद्योगपती वैभव नाईक यांच्या हस्ते याचे उध्दघाटन करण्यात आले. यानिमीत्त १५०हून अधिक जणांना मोफत सुकट भाकरीचे जेवण देण्यात आले. फेब्रुवारी म्हटला की अनेक डे येतात परंतू पाश्चात्य संस्कृतीच्या मागे मागे फिरताना आपल्या संस्कृतीचाही मागोवा घ्यायला हवा अन पिज्जा बर्गर खाताना आपल्या ‘भाकरीला’ ला ही विसरता कामा नये असे सांगत दरवर्षी हा दिवस साजरा करणार असल्याचे दर्यादारी हॉटेलचे मालक सर्वेश तरे यांनी कळवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.