गांजा तस्करी प्रकरणात युवतीला पोलिस कोठडी
गांजा तस्करी प्रकरणात युवतीला पोलिस कोठडी
लेवाजगत न्यूज भुसावळ-भुसावळ-पुरी- गांधीधाम एक्स्प्रेसमधून गांजाची वाहतूक केल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी एक अल्पवयीन मुलगा व २० वर्षांची मुलगी अशा दोघांना ताब्यात घेतले होते. पैकी संशयित मुलगी संजना ठाकूर (वय २०, रा. भोपाळ, मध्य प्रदेश) हिला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती तिला १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.
रविवारी भुसावळ रेल्वे स्थानकावर पुरी- गांधीधाम एक्स्प्रेसमधून अल्पवयीन असलेले मुलगा व मुलगी खाली उतरले. त्यांच्याजवळ दोन गाठोडे होते. लोहमार्ग पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाठोडे उघडून पाहिल्यावर सुमारे २० किलो
गांजा आढळला. पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांना सोबत घेत पंचनामा करून जप्त केलेल्या गांजाचे वजन केले. त्यात तो २० किलो भरला. या गांजाची किंमत सुमारे दोन लाख रूपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही अल्पवयीनांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यात दोघांनी सांगितलेली नावे खोटी असल्याचे निरीक्षक घेरडे यांच्या लक्षात आले.. मात्र, काही दिवस मध्य प्रदेशात सेवा दिल्याने घेरडे यांनी तेथील पोलिसांच्या मदतीने त्यांनी दोन्ही संशयित मुलांची खरी नावे शोधून काढली. त्यात मुलगा अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी २० वर्षांच्या संजनाला अटक करून न्यायालयात हजर केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत