नाशिकहून रावेरला जाणाऱ्या दोन मित्रांचा जळगावात अपघाती मृत्यू
नाशिकहून रावेरला जाणाऱ्या दोन मित्रांचा जळगावात अपघाती मृत्यू
लेवाजगत न्यूज रावेर-नाशिक येथून दुचाकीने रावेरला जाणाऱ्या "मित्रांचा बुधवारी रात्री जळगाव येथील जैन इरिगेशनजवळ अपघात झाला. त्यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. यश वासुदेव महाजन (वय २२, रा. रोकडा हनुमान नगर, रावेर) व सुमित दिवाकर पाटील (वय २६, रा. पुनखेडा, ता. रावेर) अशी त्यांची नावे आहेत.
रावेरातील रोकडा हनुमान नगरमधील वासुदेव महाजन यांचा एकुलता एक मुलगा यश हा मंगळवारी म्हाडाची परीक्षा देण्यासाठी नाशिकला गेला होता. बुधवारी परीक्षा आटोपल्यावर तो त्याचा पुनखेडा येथील रहिवासी मित्र सुमित पाटील सोबत दुचाकीने नाशिक येथून रावेरला येण्यासाठी निघाला. जळगाव जवळील जैन इरिगशनसमोर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात यशचा जागीच तर सुमितचा जळगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यश महाजन याच्यावर रावेर येथे, तर सुमित पाटील याच्यावर पुनखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत