श्रीकृष्ण नगरातील युवकाचा रेल्वेचा धक्का लागून मृत्यू
श्रीकृष्ण नगरातील युवकाचा रेल्वेचा धक्का लागून मृत्यू
लेवाजगत न्यूज जळगाव - शिवाजीनगरातील स्मशानभूमीजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने श्रीकृष्णनगरातील भाजीपाला विक्रेत्या ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सागर अरुण सरोदे (वय ३०) असे मृत युवकाचे नाव आहे. सागर हा गुरुवारी पहाटे ५ वाजता घरातून निघून गेलेला होता. सकाळी ८.३० वाजता रुळाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जीएमसीत आणला. त्यांच्या खिशात आढळलेल्या कागदपत्रांच्या आधारे मृताची ओळख पटली. रेल्वेचा धक्का लागून सागरचा मृत्यू झाला असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. सागर याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत