सावदा - फैजपूर मार्गावर अपघात ; एक जागीच ठार..!
सावदा - फैजपूर मार्गावर अपघात ; एक जागीच ठार..!
लेवाजगत न्यूज सावदा -सावदा - फैजपुर मार्गावर असलेल्या जे के स्टील जवळच दि ; १८ रोजी संध्याकाळी ७ दरम्यान मारोती अल्टो कार व मोटार सायकल अपघातात कारच्या धडकेत जबर जखमी झाल्याने जागीच ठार झाला .या घटनेने मोठा वाघोदा येथे हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे .
घटनेची माहिती कळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली .
मोठे वाघोदा येथील रहिवाशी रशीद अहमद तडवी वयअंदाजे ३६ वर्ष असून केळीचे मजुरीचे काम करणारा मजूर होता तो जेवणाचा डबा घेण्यासाठी फ करण्यासाठी फैजपूर कडे मोटारसायकल क्र .एम एच १९ बी .जे ४३७८ वरून जात असताना सावदा कडून येत असलेल्या अल्टो कार एम एच १९ A G - 6769 ही समोरून येत असताना अल्टो कारचा कट लागून जबर धडस बसल्याने घटनेत मोटरसायकल स्वार रशीद अहमद तडवी हा गंभीर जखमी झाल्याने घटनेत जागीच ठार झाला माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली मयत तडवी यास शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात रावेर हलविण्यात आले असुन अपघातातील वाहने पोलिसांनी ताब्यात घेतले असून या बाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते .पुढील तपास स . पो . नि देविदास इंगोले यांचे मार्गदर्शना खाली सहकारी करीत आहे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत