सावदा पोलीस अॅक्शन मोडवर- समाज , शेतकरी विघातक कृत्य करणाऱ्यांवर लक्ष ठेवा
सावदा पोलीस अॅक्शन मोडवर- समाज , शेतकरी विघातक कृत्य करणाऱ्यांवर लक्ष ठेवा
लेवाजगत न्यूज चिनावल- चिनावल परिसरात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या पिक चोऱ्यांचे सत्र थांबता थांबत नाही तर दुसरीकडे आज सावदा पोलीस ठाण्यात दिनांक २४ रोजी दुपारी १वाजून ३०मिनिटं वाजे दरम्यान झालेल्या बैठकीत सामंजस्य बाळगा व समाज , शेतकरी विघातक कृत्य करणाऱ्यांवर लक्ष ठेवा गावात शांतता बाळगा असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले
एकीकडे सामंजस्याने राहण्यासाठी बैठकीत चर्चा होत असताना दुसरीकडे वडगाव शेती शिवारात शेतकऱ्यांचे ठीबक फिल्टर चे नुकसान केल्याने या बाबत निभोरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली
दरम्यान दि १९ फेब्रुवारी रोजी शेतकरी मुलांना झालेल्या मारहाणी च्या तक्रारी नंतर त्याच दिवशी दोषी वर कारवाई झाली असती तर काल शेतकऱ्यांचे केळी खोड कापून नुकसान झाले नसते अशी प्रतिक्रिया उमटत आहेत
गेल्या काही दिवसांपासून चिनावल व परिसरात पिक चोरी , केळी नुकसान ,शेती साहित्य चोरी करणाऱ्या कडून शेतकऱ्यांवर हल्ला होत असल्याने यांवर कोठे तरी सकारात्मक उपाययोजना असावी या साठी आज सावदा पोलिस स्टेशनला दोन्ही बाजूंच्या ग्रामसस्थाची बैठक आयोजित केली होती या वेळी फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी पीक चोरी च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे खरोखरच मोठे नुकसान होत आहे. यातील गुन्हेगारांचा सखोल तपास करुन त्यांचेवर कारवाई केलीच जाईल या बाबत शेतकऱ्यांनी संयम राखा , गावात कायदा सुव्यवस्था कोलमडू न देता सामंजस्याने आपण कोणाचे नुकसान होणार नाही या साठी प्रयत्न करु कोणत्या तिसऱ्या व्यक्ती मुळे गावात कटू प्रसंग घडत असल्यास आपण सर्व मिळून यांची माहिती काढा जेणेकरून आपला जिव्हाळ्याचा शेती नुकसानी चां प्रश्न सुटु शकेल असे आवाहन केले.
या वेळी चिनावल पोलिस पाटील निलेश नेमाडे , गोपाळ नेमाडे , नुकसान ग्रस्त शेतकरी युवराज महाजन तसेच संजय भालेराव सर शेषराज भालेराव , दिपक लहासे , दशरथ भालेराव , आनंदा ठाकरे , युवराज भालेराव , विनोद भालेराव , उत्तम भालेराव हे या बैठकीला हजर होते
सदर वेळी सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि देविदास इंगोले यांनी ही शेतकऱ्यांच्या पिक संरक्षण ला प्राधान्य देवून दोषीवर या पुढे तात्काळ कारवाई करणेचे संकेत दिले
दरम्यान दि २३ चे रात्री वडगाव शिवारात संग्राम नेमीचद गाजरे यांचे अज्ञात ईसमानी ठीबक सिंचन चे फिल्टर ची तोडफोड करून नुकसान केले आहे या बाबत निभोरा पोलिसांत ४२७ अन्वये गुन्हा नोंद झाला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत