सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग , पिता - पुत्र विरुद्ध गुन्हा
सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग , पिता - पुत्र विरुद्ध गुन्हा
लेवाजगत न्यूज फैजपूर-: .यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक या गावात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा पिता - पुत्रांने विनयभंग केला .
ही घटना गुरुवारी अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरासमोर घडली . या प्रकरणी फैजपुर पोलिसात पिता - पुत्र विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
चिखली बुद्रुक ता . यावल येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीने फैजपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी सकाळी अकरा वाजता ती घराच्या समोर असतांना तेथे गावातील रहिवासी ऋषिकेश गोपाल पाटील व त्याचे वडील गोपाळ भास्कर पाटील हे आले व मागील भांडणाच्या कारणावरून त्यांनी अल्पवयीन मुलीस व तिच्या आईला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच सदर भांडणात अल्पवयीन मुलीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्यांनी केले तेव्हा सदर अल्पवयीन मुलीने फैजपूर पोलीस ठाणे गाठले व या दोघा पिता - पुत्र विरुद्ध बालिकेचा विनयभंग , मारहाण , शिवीगाळ करणे सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये महिला पोलिस कर्मचारी सुशीला भिलाला यांनी फिर्यादी घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास डीवायएसपी डॉ . कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर करीत आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत