Header Ads

Header ADS

शहरात थंडीच्या कडाक्याने चार जणांचा बळी ' दोघांची ओळख पटली

 


शहरात थंडीच्या कडाक्याने चार जणांचा बळी ' दोघांची ओळख पटली

वृत्त संस्था जळगाव-शहरात थंडीच्या कडाक्याने चार जणांचा बळी गेला असून, हे चौघे रस्त्यावर मृतावस्थेत आढळून आले होते. दरम्यान, यापैकी दोन रुग्णांची ओळख पटली आहे. एक रुग्ण भुसावळ येथील तर एकाची मात्र काहीही माहिती नसल्याचे सूत्रांनी सांगितले. चारही मृत हे पुरुष असून, चाळीस वर्षांवरील आहेत.

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृतावस्थेत आणलेल्या या चारही रुग्णांचे शवविच्छेदन करण्यात आले असून यापैकी एक खोटेनगरातील रहिवासी आहे तर एक भुसावळ येथील आहे. खोटेनगरातील व्यक्तीचा अतिमद्यप्राशनाने तर एका रुग्णाचा लिव्हर व फुप्फुसाचे विकार असल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भुसावळ येथील रुग्ण २९ जानेवारीला रस्त्यावर आढळून आला होता. ओळख न पटल्याने सोमवारी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, हे चारही रुग्ण रस्त्यावर थंडीत आढळून आलेले होते. त्यांचे हात-पाय आकुंचन पावलेले दिसून आल्याने त्यांचा गारठून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. दरम्यान, हे सर्व रुग्ण सहव्याधिग्रस्त असल्याने त्यांना थंडीचा अधिक त्रास झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 एक्सपर्ट व्यू डॉ. सुशील गुर्जर, फिजिशियन, जळगाव

   हृदयासह पक्षाघाताच्या समस्या थंडीमुळेच अधिक बळावतात

   थंडीत खोकल्याचा सर्वाधिक त्रास रुग्णांना जाणवतो. सर्वसामान्य व्यक्तीलादेखील खोकल्याच्या समस्या या दिवसात होतात. मात्र, व्याधिग्रस्त असलेल्या व्यक्तींना हा त्रास दुपटीने होतो. डायबेटिस असलेल्या व्यक्तीला खोकला झाल्यास त्याचा हृदयावर ताण पडतो.

  थंडीच्या दिवसात हृदयाच्या समस्यांसह पक्षाघाताचादेखील धोका असतो. हे आजार अधिक बळावत असल्याने रुग्णांचा मृत्यू ओढवतो. दरम्यान, यापूर्वी ज्या व्यक्तींना हृदयाचा झटका अथवा पक्षाघात होऊन गेला आहे, अशा व्यक्तींनाही थंडी सहन होत नाही.

   स्त्यावर राहणाऱ्या व्यक्तींना व्याधींसह जेवण मिळत नसल्याने जीवनसत्त्वाची व रक्ताची कमतरता असते. अशा व्यक्ती थंडीचा कडाका सहन करू शकत नाही. या दिवसात अधिक त्रास झाल्याने हात-पायदेखील काम करत नाही. धाप लागणे, खोकला येणे, हृदयावर ताण पडणे अशा समस्या भेडसावतात व त्यांचा मृत्यू होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.