Header Ads

Header ADS

अट्रावल येथील मुंजोबा यात्रोत्सव आजपासून


 अट्रावल येथील मुंजोबा यात्रोत्सव आजपासून

लेवाजगत न्यूज यावल- खान्देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील अट्रावल येथील प्रसिद्ध मुंजोबा देवस्थानच्या यात्रेस २ फेब्रुवारीपासून सुरवात होत आहे. ही यात्रा १६ फेब्रुवारीपर्यंत चालेल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० भाविकांनाच दर्शनासाठी मंदिर परिसरात प्रवेश देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापन समिती कडून सांगण्यात आले आहे.


 विशेषतः शुद्ध पक्षातील सोमवार व शनिवार या दिवशी संपूर्ण जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, खंडवा येथून भाविक येथे दर्शनाला येत असल्याने तालुक्यातील ही मोठी यात्रा म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. अट्रावलचा मुंजोबा नवसाला पावणारा म्हणून भाविकांची श्रद्धा आहे. कौटुंबिक अडीअडचणी सुटाव्यात यासाठी भाविकांकडून मुंजोबाला साकडे घातले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.