Header Ads

Header ADS

तमाशा मंडळातील तरुण-तरुणीची आत्महत्या


तमाशा मंडळातील तरुण-तरुणीची आत्महत्या  

प्रतिनिधी पारोळा- धुळे जिल्ह्यातून तमाशाचा कार्यक्रम आटोपून भुसावळ येथे परत जाणाऱ्या तरुण व  तरुणीने पारोळा येथे दिनांक २३ रोजी विष प्राशन केले होते. त्यात दोघांचा २५ रोजी मृत्यू झाल्याने कलावंतावर शोककळ पसरली आहे.

 या दोन्ही तमाशा मंडळ मधील कलावंतांनी विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. यांच्या मृत्यूने तमासगिरी मंडळात एकच शांतता पसरली होती.

    याबाबत त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही परंतु दोघांनी एकमेकांशी घट्ट मैत्री होती असे बोलले जात होते.२२ फेब्रुवारी रोजी तमाशाचा कार्यक्रम आटोपून दि. २३ रोजी सकाळी भिमा नामा तमाशा मंडळ  हे भुसावळ येथे वाहनाने जात होते. यावेळी त्यांचे  वाहन पारोळा येथे कजगाव रोड लगत खराब झाले. यांच्या गाडीतील सर्वजण कजगाव-पारोळा रोडवरील एच  पी. पेट्रोल पंपाच्या बाजुला वाहनासह थांबले.  यावेळी मंडळातील कलाकार अंजली अशोक नामदास व सुनिल उर्फ योगश नामदेव बोरसे हे  पारोळा शहरातील  मच्छी बाजारात जावून येतो, असे सांगून गेले. मात्र ते दुपारी १.३० वाजेपर्यंत न आल्याने त्यांची शोधाशोध सुरु झाली असता ते मच्छीबाजारात सापडले मात्र दोघांनी विष  घेतल्याचे सांगितल्याने त्यांना मोनिका व अनिल नामदेव बोरसे,ज्ञानेश्वर रामदास गोपाळ, नामदेव अभिनंदन बोरसे यांनी कृष्णा हॉस्पिटल पारोळा येथे औषधोपचाराचा कामे दाखल केले. त्यानंतर अंजली अशोक नामदास (वय २० राहणार भुसावल दत्तनगर कॉलनी वांजोळा रोड) तिच्यावर उपचार सुरू असताना कृष्ण हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पुढील उपचार कामी अंजली हिस२५ रोजी दुपारी साडेबारा वाजता कुटीर रुग्णालय पारोळा येथे दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार सुरू असताना तेथील डॉक्टरांनी अंजली अशोक नामदास हिस दुपारी दोन वाजता मृत घोषित केले. याबाबत अंजली ची बहिण मोनिका अनिल बोरसे वय २६ हिने पारोळा पोलिसांना दिलेल्या खबरीवरून नोंद करण्यात आली आहे.

 तर दिनांक २५ रोजी सायंकाळी पाच वाजता कुटिर रुग्णालय पारोळा येथे उपचारासाठी दाखल असताना तेथील डॉक्टरांनी सुनील उर्फ योगेश नामदेव बोरसे (वय १९ राहणार अंजाळे तालुका यावल) यास संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी तपासून मृत घोषित केले.

    याबाबत अनिल नामदेव बोरसे( वय ३३ राहणार अंजाळे तालुका यावल) यांनी दिलेल्या खबरी वरील पारोळा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नायक प्रवीण पारधी करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.