Header Ads

Header ADS

ठाण्यात होणार "नारी तू नारायणी रत्न पुरस्कार आणि सौंदर्य स्पर्धा"

 


ठाण्यात होणार "नारी तू नारायणी रत्न पुरस्कार आणि सौंदर्य स्पर्धा"


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ग्रोइंग किड्स प्रीस्कूल संस्थेच्या वतीने "नारी तू नारायणी रत्न पुरस्कार व सौंदर्य स्पर्धा" पर्व दोनचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम शनिवार, १९ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता ठाण्यातील समारंभ लॉन्स येथे होणार आहे. हेमा भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, ठाणे आणि मुंबईतील मान्यवर सदस्य उपस्थित राहणार आहेत. सौंदर्य स्पर्धेचे परीक्षण दंत शल्यचिकित्सक, रॅम्पवॉक मॉडेल, समाजसेविका डॉ. सुमाया रेश्मा करतील.  सुमित बोत्रा (सीईओ-हॅपी ह्यूज) आणि डॉ. संगीता पाटील (सीईओ-हे फाउंडेशन) आणि फॅशन उद्योगातील अनेक मान्यवरांना सादर आमंत्रित केले आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी 9004099380 या क्रमांकावर संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.