Header Ads

Header ADS

रिक्षेत बसलेल्या वृद्धाला लुटणाऱ्या तिघांना अटक

 


रिक्षेत बसलेल्या वृद्धाला लुटणाऱ्या तिघांना अटक

लेवाजगत न्यूज जळगाव-रिक्षेत बसलेल्या वृद्ध प्रवाशाला लुटणाऱ्या तिघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली. विद्युत कॉलनीजवळ ही घटना घडली होती. रामानंदनगर पोलिस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोसीन खान नूरखान पठाण ( वय २०, रा. पिंप्राळा- हुडको), शाहरुख शेख रफिक (वय २०, रा. पिंप्राळा-हुडको) व समाधान सुमेरसिंग पाटील (वय ३३, रा. डेरावनगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. 

      शेख जलील शेख इब्राहिम (वय ७२, रा.पंचशीलनगर,तांबापुरा) हे धुळे येथे मुलीला मंगळसूत्र देण्यासाठी जात होते बुधवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणी चौकातून ते धुळ्याला जात असलेल्या रिक्षेत बसले. 

      तत्पूर्वीच रिक्षाचालकासह तीन व्यक्ती त्या रिक्षेत बसलेल्या होत्या. त्या व्यक्ती शेख यांना सारख्या ढकलत होत्या. त्याबाबत त्यांनी विचारले असता दमदाटी केली. विद्युत कॉलनीजवळ चालकाने रिक्षा थांबवली. रिक्षामध्ये गर्दी होत असल्याचे सांगून त्यांना रिक्षेतून उतरून दिले. त्या वेळी शेख यांनी खिशात ठेवलेले मंगळसूत्र चाचपडून बघितले असता चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.