उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट
उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : उद्या ९ फेब्रुवारी २०२२ पासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट मिळणार आहे. दुपारी १ च्या पुढे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं दिली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना पुन्हा वाढल्याने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांच काय होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुलांचं लसीकरण करत शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला.
बारावी परीक्षांचे ऑनलाइन हॉल तिकीट www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान हॉल तिकीट मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्यासाठी प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी कोणतेही शुल्क न घेता सदर हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हॉल तिकीट कसं डाऊनलोड कराल?
सर्वात आधी तुम्ही वापरत असलेल्या इंटरनेट ब्राऊजरमधून www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर जा. त्यांनंतर College login या पर्यायामध्ये जाऊन त्याठिकाणी हॉल तिकीट ऑनलाइन डाउनलोड करु शकता .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत