तीन तरुणांनी संपवले स्वस्ताचे जीवन- मुक्ताईनगर आणि यावल तालुक्यातील घटनांमुळे जिल्हाभर खळबळ
तीन तरुणांनी संपवले स्वस्ताचे जीवन
मुक्ताईनगर आणि यावल तालुक्यातील घटनांमुळे जिल्हाभर खळबळ
जुने मुक्ताई रस्त्यावर आढळला मृतदेह
मुक्ताईनगर । निमखेडी खुर्द येथील अविनाश अरुण लवांडे (वय २२) याने मुक्ताईनगर येथील जुने मुक्ताई मंदिर रस्त्यावरील आस्था नगरी जवळ मंगळवारी सायंकाळी विष पिऊन आत्महत्या केली. सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान घटना उघडकीस आली. अविनाश त्याच्या पत्नीसह अष्टविनायक कॉलनीत लग्नासाठी आला होता. पत्नीला तुझे ब्लाऊज शिवून आणतो असे सांगून तो सोमवारी दुपारी चार वाजता घराबाहेर पडला. परत न आल्याने नातेवाइकांनी शोध घेतला. पोलिसांतही तक्रार केली. मंगळवारी सायंकाळी अविनाशचा मृतदेह आढळला. त्याने काहीतरी विषारी द्रव प्राशन केल्याचा संशय आहे.
महिलेने लग्नासाठी छळ केल्याचा आरोप
मुक्ताईनगर -एका महिलेने लग्न करण्याचा तगादा लावल्याने तालुक्यातील उंचदा येथील अजय सीताराम इंगळे (वय २५) याने खामखेडा येथील पूर्णा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला मृत अजयचा भाऊ मनोज इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगीता नामक एका महिलेने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी आग्रह धरून अजयचा मानसिक छळ केला. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकाराला कंटाळून अजयने मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता पूर्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित महिलेस ताब्यात घेतले.
चिंचोली येथे शेतमजूर तरुणाची आत्महत्या
यावल तालुक्यातील चिंचोली येथील २१ वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ८ रोजी सकाळी साडेसातला कासारखेडा शिवारात ही घटना घडली ललित उर्फ लक्ष्या वासुदेव कोळी (२१) असे या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित हा आईवडील व भाऊ यांच्यासह चिंचोली येथे वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून उदरनिर्वाह करतात. सोमवारी ७ रोजी आहे. दुपारी ४ वाजता गुरांना चारा टाकून येतो, असे सांगून घरातून शेतात गेला होतो. त्यानंतर ललित हा रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबियांने त्याचा शोधकेला असता मिळून आला नाही.
दरम्यान, गावातील ललित कोळी यांच्या कासारखेडा शिवारातील शेतातील एका निंबाच्या झाडाला ललितचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत गावातील शेतमजूर मयूर सुभाष कोळी यास मंगळवारी सकाळी दिसला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि विवाहित बहिण असा परिवार
पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र बागुल करीत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत