यावल तहसीलदारांना कोरोना ची बाधा
यावल तहसीलदारांना कोरोना ची बाधा
लेवाजगत न्यूज यावल : कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरला असला तरी तालुक्यात कोरोनाचे तुरळक स्वरूपात रुग्ण आढळून येत आहे तर गुरुवारी येथील तहसीलदार महेश पवार यांनाच कोरोना ची बाधा झाल्याचे तपासणीत समोर आले आहे . गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती व कोरोना संदर्भातील लक्षणे त्यांच्यात जाणवत होती . म्हणून त्यांनी स्वतः येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये आपली तपासणी करून घेतली यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे तेव्हा आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपापली तपासणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार महेश पवार यांनी केले असून कोरोना संदर्भातील लक्षणे आढळत असतील तर अशा नागरिकांनी आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत