Contact Banner

वाघोद्याच्या तरुणाने सुसाइड नोट लिहून केली आत्महत्या


 वाघोद्याच्या तरुणाने सुसाइड नोट लिहून केली आत्महत्या

वृत्तसंस्था यावल-तालुक्यातील वाघोदा येथे एका ३५ वर्षीयतरुणाने  पटचारी परिसरात गळफास घेहून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. जगदीश हिरामण पाटील असे मृताचे नाव असून त्याने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे.

     वाघोदा येथील जगदीश हिरामण पाटील हा सकाळी शेती कामाला जातो, असे सांगून घरून निघाला. मात्र सायंकाळ झाली तरी तो घरी परत आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेतला असता साकळी शेती शिवारातून जाणाऱ्या पाटचारीजवळ जगदीश पाटील हा गळफास घेऊन मृतावस्थेत आढळला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात येऊन मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. येथे पोलिस पाटील अशोक पाटील गिरडगाव, वाघोद्याचे माजी पोलिस पाटील प्रकाश पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य प्रभाकर पाटील, मधुकर पाटील यांच्यासह मृताचे नातेवाईक पोलिस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणी नितीन पाटील यांच्या खबरीवरून यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत जगदीश याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार असून त्याच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.


वैयक्तिक आयुष्याला कंटाळून आत्महत्या; नोटमध्ये उल्लेख

    मृत जगदीश पाटील याने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्याने म्हटले आहे की, मी माझ्या वैयक्तिक आयुष्याला कंटाळून आत्महत्या करत आहे. तरी माझ्या आत्महत्येशी कुणाचा काही एक संबंध नाही. तरी कुणाला त्रास होईल, असे वागू नये, ही विनंती. असा मजकूर या सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचे आढळले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.