Header Ads

Header ADS

धक्कादायक : अमळनेरात नवजात बालकाचा मृतदेह घंटा गाडीच्या कचऱ्यात आढळला

 


धक्कादायक : अमळनेरात नवजात बालकाचा मृतदेह घंटा गाडीच्या कचऱ्यात आढळला 

लेवाजगत न्यूज अमळनेर-- पालिकेच्या कचरा जमा करणाऱ्या घंटा गाडीत नवजात बालकाचा मृतदेह आढळून आल्याने अमळनेर शहरात खळबळ उडाली आहे. 

     याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सविस्तर माहिती अशी की , अमळनेर नगरपालिकेच्या घंटागाडीवर फिरोज समसोद्दिन खाटीक ( वय -४५ ) रा . लक्ष्मी टाकी जवळ , गांधलीपुरा हे चालक म्हणून काम पाहतात . शनिवार १९ मार्च रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास शहरातील वार्ड क्रमांक ८ येथील सम्राट कॉलनी , द्वारका नगर , बोरसे गल्ली , रामकृष्ण कॉलनी या परिसरातून फिरोज खाटील हे घंटागाडीतून ओला व सुखा कचरा जमा करून नगरपालिकेच्या टेकडीवरील कचरा डेपो येथे गाडी खाली केली . त्यावेळी कचरा डेपोवर काम करणाऱ्या महिलांना एका कागदात आणि प्लास्टिकच्या पिशवीत पुरूष जातीचे नवजात अभ्रक मयतस्थितीत आढळून आले . हा प्रकार पाहून महिलांना धक्का बसला . 

       दरम्यान , याबाबत महिलांनी माहिती  पालिकेच्या अधिकाऱ्यांना व चालक फिरोज खाटीक यांना दिली असता . त्यांनी कचराडेपो येथे धाव घेतली . त्याचप्रमाणे अमळनेर पोलीस ठाण्यात कळविण्यात आले . पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला . याप्रकरणी घंटागाडीचे चालक फिरोज खाटीक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास कॉ सुनिल हटकर करीत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.