आपुलकीची भेट मोठ्या मनाने दिली; आदिवासी बांधवांची आनंदी झाली होळी
आपुलकीची भेट मोठ्या मनाने दिली; आदिवासी बांधवांची आनंदी झाली होळी
उरण (सुनिल ठाकूर) : स्वतः साठी तर सगळेच जगतात …आयुष्यात दुसऱ्यांसाठी पण जगत राहावं !…आपल्या ताटातील भाकरीचा तुकडा एखाद्या भुकेल्या गरजूवंतांच्या मुखी घालून पहावं !!….. गरीब -श्रीमंत, उच्च -निच्चतेचे भेदभाव विसरून बंधूभावनेनं प्रेमाच्या रंगात न्हाऊंन निघण्याचा आणि माणुसकीच्या संस्कारातून रुजलेल्या गोड पोळीचा सण … म्हणजे ….होळीचा सण … आणि ह्याच अविट-गोड सणात आपल्या बाळ-गोपाळांसोबत आपला पण सण आनंदात साजरा व्हावा या विचारांच्यां विवंचनेत असणार्या माझ्या वाडी -वस्ती वरील आदिवासी बांधवांनां ह्या दोन वर्षांच्या कोरोना महामारीच्या महाभयानक काळात रोजी-रोजगाराच काहीच साधन उरलं नाही अश्यातच माझ्या आदिवासी बांधवांनां आपण सण साजरे तरी कसे करायचे ?..ह्या प्रश्नाचं काहूर त्यांच्या मनाला सतावतं असतो !… पण …असं पण एक व्यक्तिमत्त्व आहे
जे माझ्या आदिवासी बांधवांकरिता सदैव आशेचा किरण बनून उभा असतो,त्यांची दिवाळी, त्यांची होळी आनंदात साजरी व्हावी ,गोड व्हावी या करीता …दरवर्षी त्यांचे प्रत्येक सण उत्सव आनंदात साजरे करायला मदत करनारा,प्रत्येक संकट समयी मदतीचा हात पुढे करणारा,त्यांच्या मदतीला धावून जाणारा त्यांच्या जीवाचा मैतोर … अर्थात …रायगड भूषण …. सन्माननीय श्री राजू मुंबईकर साहेब…यांनी या हि वर्षी आपल्या मनाच्या मोठेपणाचं दर्शन घडवत … रानसई …येथील … खोंड्याची वाडी,मार्गाची वाडी,भुर्याची वाडी,बंगल्याची वाडी, खैरकाठी,सागाची वाडी ,…ह्या सर्व आदिवासी वाड्यांवरील बांधवांच्यां कुटुंबाची होळी आनंदीत व्हावी म्हणून त्यांना ह्या वर्षी… तब्बल …१५० ( दीडशे किलो ) …चणे हरभरेे प्रत्येक वाडीवर पंचवीस किलो या प्रमाणे वाटप करण्यात आले.
… श्री राजू मुंबईकर साहेबांनी रानसई येथील सर्व आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांनां होळीच्या शुभेच्छा देत त्यांच्या करिता दिलेली ही प्रेमाची …आणि…. आपुलकीची भेंट मिळाल्यावर त्या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांच्या डोळ्यांतील ते आपुलकीचे निरागस आनंदी भाव पाहून खरचं होळी सणाचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला आणि होळीच्या भावनिक रंगात न्हाऊन गेला.असंच म्हणावे लागेल !…
कोणत्याही टिप्पण्या नाहीत