अरेच्या हे काय घडतंय चक्क -नंदी पिऊ लागला पाणी- भाविकांची उडाली झुंबड !
अरेच्या हे काय घडतंय चक्क -नंदी पिऊ लागला पाणी- भाविकांची उडाली झुंबड !
लेवाजगत न्यूज चिनावल- येथील महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती ही आज सकाळी ११पासून अचानक पाणी पिऊ लागल्याचे दिसून आल्याने येथे भाविकांची गर्दी उसळली आहे . तर या मागे शास्त्रीय कारण असून हा चमत्कार नव्हे तर विज्ञानाच्या सिध्दांतानुसार होत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.१९९५ साली गणपतीच्या मूर्ती दूध पित असल्याची माहिती आल्यामुळे उडालेला गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण हे अनेक दिवस कायम होते . २१ सप्टेंबर रोजी पहिल्यांदा याची माहिती समोर आली होती . अनेक दिवसांपर्यंत याबाबत दावे - प्रतिदावे करण्यात आले होते . शेवटी भौतीकशास्त्रातील कॅपिलरी ऍक्शन या गुणधर्मामुळे गणपतीच्या मूर्ती दूध पित असल्याचे शास्त्रज्ञांनी जाहीर केले होते . तेव्हापासून अनेकदा असे प्रकार घडले आहेत . यातीलच नवीन प्रकार आता रावेर तालुक्यातील चिनावल व सावदा येथे उघडकीस आला आहे . आज सकाळपासूनचिनावल येथील महादेव वाड्यात असणाऱ्या महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती ही पाणी पित असल्याचे दिसून आले आहे . नंदीच्या मूर्तीजवळ चमच्याने पाणी घेऊन गेले असता ते मध्ये शोषले जात असल्याचे भाविकांना आढळून आले असून याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत .
दरम्यान , काही तासामध्येच ही बातमी परिसरात पसरल्यानंतर शेकडो भाविकांनी चिनावल येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी धाव घेतली आहे . अनेक भाविकांनी तेथील नंदीच्या मूर्तीला पाण्याने भरलेला चमचा लावल्यानंतर हे पाणी मूर्तीमध्ये शोषले जात असल्याची अनुभूती घेतली आहे . यामागे दैवी चमत्कार असल्याची भाविकांची भावना आहे . दरम्यान , दुपारी आलेल्या माहितीनुसार नंदीची मूर्ती पाणी पित असल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडू लागल्या आहेत . यात शिरसोली , सावखेडा,सावदा आदी जळगाव जिल्ह्यातील गावांमध्ये याच प्रकारच्या घटना अनुभवायला आल्या आहेत . तर मध्यप्रदेशातील इंदूर येथील एका शिव मंदिरातही हा प्रकार घडत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत . दरम्यान , या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने काही जाणकारांशी चर्चा केली असता गणपती दूध पित असल्याच्या प्रकरणातील कॅपिलरी ऍक्शन आणि सरफेस टेन्शन आदी गुणधर्मांमुळे हा प्रकार होत आहे . यामागे दैवी कारण नसून वैज्ञानिक गुणधर्म आहे . मात्र कुणाच्याही भावना आणि श्रध्दा न दुखावता हा प्रकार स्वीकारावा असे आवाहन करत आले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत