Header Ads

Header ADS

सरफेस टेन्शन मुळे पाणी घेतले जाते,नंदीला बदनाम करु नका -महाराष्ट्र अंनिसचे भाविकांना आवाहन

 सरफेस टेन्शन मुळे पाणी घेतले जाते,नंदीला बदनाम करु नका -महाराष्ट्र अंनिसचे भाविकांना आवाहन 

पूर्ण भारतभर आज नंदी, महादेवाची मूर्ती ,कासव हे पाणी पिताना चा चमत्कार सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे .आणि मंदिरात भाविक रांगलावत पाणी पाजण्याचा चमत्काराचा अनुभव घेताना आढळून येत आहेत .कोणतीही निर्जीव वस्तू पाणी पीत नाही हे वैज्ञानिक सत्य आहे. नंदीची मूर्ती पाणी खेचते ते केवळ पृष्टीय ताण किंवा सरफेस टेन्शन या वैज्ञानिक तत्वामुळे. समान गुणधर्म असलेले द्रवपदार्थ जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा पदार्थाच्या थेंबाच्या वरच्या बाजूला अनुरेणू चा असलेला पृष्टीय थर हा दुसरा त्याच गुणधर्माचा थेंबाला स्पर्श केला असता खेचला जातो .मूर्ती स्वतः पाणी खेचते असते ती एका थेंबाच्या  रूपात असते आणि नवीन पाण्याचा चमचा ज्या वेळेस त्या पाण्याच्या पृष्ठभागाला स्पर्श केला जातो त्यावेळेस ते पाणी खेचले जाते. याला विज्ञानाच्या भाषेत सरफेस टेन्शन किंवा पृष्टीय ताण असे म्हटले जाते .यामागे कोणत्याही प्रकारचा चमत्कार नसून भाविकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.


 विनायक सावळे ,

राज्य सरचिटणीस ,

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.