Header Ads

Header ADS

दहावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये दोन चुका शिक्षकांचा दावा : विद्यार्थ्यांना ६ गुण मिळावे, विद्यार्थ्यांची मागणी

 


दहावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये दोन चुका

शिक्षकांचा दावा : विद्यार्थ्यांना ६ गुण मिळावे, विद्यार्थ्यांची मागणी

 लेवाजगत न्यूज सावदा -१९ मार्च रोजी झालेल्या दहावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये दोन प्रश्नांमध्ये चुका असल्याने विद्यार्थ्यांना ते सोडवता आले नाही, त्यामुळे ६ गुणांचे नुकसान होणार असून, ते गुण मिळावेत, अशी मागणी विद्यार्थी व शिक्षकांनी केली आहे.

      सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. १९ मार्च रोजी इंग्रजीचा पेपर झाला. त्यात प्रश्न क्रमांक ६ A मध्ये शाब्दिक ते अशाब्दिक (व्हर्बल टू नॉन व्हर्बल) यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त डू अॅण्ड डोन्ड असे कॉलम करून संभ्रमात टाकलेले आहे. या प्रश्नांमध्ये कुठलाही टी डायग्राम किंवा चार्ट दिलेला नसून, विद्यार्थ्यांना ते शाब्दिकच लिहायचे आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका काढताना चूक झालेली असल्याचा गोंधळ उडाला असा दावा इंग्रजीच्या काही शिक्षकांनी केला आहे. हा प्रश्न ५ गुणांचा होता. तसेच प्रश्न क्रमांक २ मधील A4 हा व्याकरणाचा प्रश्न सुद्धा चुकलेला असल्याचा दावा शिक्षकांनी व विद्याथ्यांनी केला आहे. दिलेले वाक्य कोणत्या काळातील आहे हे सुद्धा कळायला मार्ग नाही. वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्स (साधा वर्तमान काळ) मध्ये रूपांतरित करायचे सांगितले आहे; परंतु वाक्याची रचना नेमकी कुठल्या काळातील आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची येथेही बोर्डाने दखल घेणे आवश्यक आहे,. विद्यार्थ्यांना या प्रश्नाचा सुद्धा एक मार्क मिळणे अपेक्षित आहे. यापूर्वी बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्येही काही चुका होत्या. त्याचाही मनस्ताप विद्यार्थ्यांना झाला. बोर्डाने तत्काळ दखल घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.