माजी जि प सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे यांचा नातू ,भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्यू
माजी जि प सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे यांचा नातू ,भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्यू
लेवाजगत न्यूज जळगाव- भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या बालकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मोहाडी गावाजवळ घडली . या संदर्भातील वृत्त असे की , सुजय गणेश सोनवणे ( वय १३ ) हा मुलगा आज बुधवार सकाळी साडे अकराच्या सुमारास जळगावहून मोहाडी गावाकडे जात होता . याप्रसंगी गावाजवळ असलेल्या उताराजवळ एमएच -२८ बी ७७०३ या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या एमएच १९ डीएम ११ या क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली .यात त्याचा जागीच मृत्यू झाला . दरम्यान , मयत सुजय हा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकरआप्पा सोनवणे यांचे पुत्र गणेश सोनवणे यांचा पुत्र होता . यामुळे सोनवणे कुटुंबावर वज्राघात झाला आहे .दरम्यान , या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली . सुजयचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला असून तेथे आप्तांनी प्रचंड गर्दी केली आहे . जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे , जि.प. सदस्य पवन सोनवणे , जळगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल आदींसह इतरांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत