Header Ads

Header ADS

फैजपूर शहरातुन १८वर्षीय तरूण चिठ्ठी लीहून घरातुन बेपत्ता , कुटुंबाकडून शोध सुरू

 


फैजपूर शहरातुन १८वर्षीय तरूण चिठ्ठी लीहून घरातुन बेपत्ता , कुटुंबाकडून शोध सुरू 

लेवाजगत न्यूज फैजपूर :- शहरातील कासार गल्लीतील राहणारा तरूण मोबाईल आणि चिठ्ठी लिहून घरातून निघून गेला आहे . नातेवाईकांकडून त्याचा शोधाशोध सुरू असुन , अद्याप याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नाही . आदित्य तुळशीराम काठोके ( वय -१८ ) हा तरूण फैजपूर शहरातील कासार गल्लीत राहतो कुटुंबात आई , वडील आणि बाहिणी असा परिवार आहे . आदित्य सध्या जळगाव येथील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेत आहे तर वडील तुळशीराम काठोके हे प्लॉट खरेदी व विक्री करण्याचे काम करतात . दरम्यान , सोमवारी २१ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अदित्य काठोके हा घरात कुणाला काहीही न सांगता त्याचा मोबाईल आणि चिठ्ठी लिहून घरातून कपड्यांची बॅग घेवून बेपत्ता झाला आहे . चिठ्ठीत त्याने लिहून ठेवले की , मला घरात सन्मान मिळत नाही , म्हणून मी घर सोडून जात आहे , मला कुणी विचारत नाही . असा मजकूर लिहिलेला आढळला . आईवडील व बहिण यांनी आदित्य याचा शोध केला आहे अद्याप फैजपूर पोलीसात कुठलीही नोंद अथवा तक्रार करण्यात आलेली नाही . कुणाला सदरील तरूण आढळून आल्यास 9423914789 , 9595766378 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .या बाबतची पोस्ट सोशल मीडिया ला पण त्यांच्या कुटुंब व मित्र मंडळी कडून व्हायरल केली जात आहे.

हा युवक मंगळवारी कल्याण येथे सुखरूप सापडला आहे.

    कुटुंबाकडून सर्वत्र त्याचा शोध घेतला जात होता दरम्यान आज मंगळवारी दुपारी सदर तरूण हा कल्याण येथे मिळून आला आहे . तेव्हा या तरूणाच्या शोधा करीता नातेवाई , मित्र मंडळी यांनी खुप परिश्रम घेतले तेव्हा काठोके कुटुंबा कडून सर्वाचे आभार व्यक्त करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.