Header Ads

Header ADS

इन्टाग्रामवर मैत्री करून जळगावातील विवाहितेवर अत्याचार

 

इन्टाग्रामवर मैत्री करून जळगावातील विवाहितेवर अत्याचार 

लेवाजगत न्यूज जळगाव- इन्टाग्रामवर मैत्री करून ३३ वर्षीय विवाहितेवर हॉटेलमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.एवढेच नाही तर हॉटेलमध्ये केलेले व्हिडीओ दाखवून ५० हजाराची मागणी केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      सविस्तर माहिती अशी की , रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३३ वर्षीय विवाहिता ही आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे.  हे ब्युटीपार्लरचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे इन्ट्राग्रामवर सोशल खाते आहे. या खात्यावरून संशयित आरोपी गणेश प्रकाश चौधरी (वय -४८) रा. जळगाव याची ओळख निर्माण झाली. दरम्यान इन्ट्राग्रामवर मैत्री झाल्याने फेशीयल करण्याच्या कारण दाखवून विवाहितेला शहरातील एका हॉटेलमध्ये गणेश चौधरी हा घेवून गेला. विवाहितेच्या इच्छेविरूध्द तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा फिरऊन आणण्याचे बहाण्याने हॉटेलमध्ये घेवून गेल्यावर पुन्हा अत्याचार केला. संशयित आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यांनी केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ बनविला. व्हिडीओ बनवून विवाहितेला ५० हजाराची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्या पतीला दाखवले अशी धमकी दिली.

        संशयित आरोपी गणेश चौधरी याला समजविण्याचा प्रयत्न केला आता विवाहितला मारहाण केली व तिच्या पतिकडून फेसबुकवरून पैश्यांची मागणी केली. विवाहितेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश चौधरी याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शांताराम पाटील हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.