Header Ads

Header ADS

IPL 2022 चे वेळापत्रक जाहीर ; “ असे " होतील सामने

 IPL 2022 चे वेळापत्रक जाहीर ; “ असे " होतील सामने 

लेवाजगत न्यूज मुंबई : - बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या सामन्यांना आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत . आयपीएल 2022 चा शुभारंभ मुंबई नगरीतून होणार असून वानखेडे मैदानावर पहिला सामना सीएसके विरुद्ध केकेआर यांच्यात शनिवार 26 मार्च रोजी खेळवला जाईल .आयपीएलचा हा 15 वा हंगाम भारतामध्ये कोरोना नियमांचे पालन करुन होणार आहे . लीग स्पर्धेत 70 सामने होणार आहेत . मुंबईतील वानखेडे मैदानावर 20 , ब्रेबॉन मैदानावर 15 , डीवाय पाटील मैदानावर 20 आणि पुण्यातील मैदानावर 15 सामने खेळवले जाणार आहेत . प्रत्येक संघाचे चार चार सामने वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडिअम या मैदानावर होणार आहे . तर प्रत्येक संघाचे तीन तीन सामने ब्रेबॉन आणि पुणे मैदानावर होणार आहेत . प्रत्येक संघ लीग स्टेजमध्ये 14 सामने खेळणार आहे . त्यामध्ये पाच संघाविरोधात प्रत्येक संघाला दोन तर चार संघाविरोधात एक एक सामना खेळावा लागणार आहे .26 मार्चपासून सामन्यांना मुंबईत सुरुवात होणार आहे . आयपीएलचा पहिला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा असा पार पडणार हे याआधीच जाहीर झाले होते . पण आता संपूर्ण आयपीएलचे वेळापत्रक जाहीर आहेत .आयपीएलचा अंतिम सामना 29 मे रोजी खेळवला जाणार आहे . आज संपूर्ण वेळापत्रक बीसीसीआयने ( BCCI ) ट्वीट करत जाहीर केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.