मद्यपी चालकाच्या ट्रकच्या धडकेत टेम्पो उलटला : एक जण जखमी
मद्यपी चालकाच्या ट्रकच्या धडकेत टेम्पो उलटला : एक जण जखमी
लेवाजगत न्यूज यावल :- अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर चुंचाळे फाट्याजवळ दारूच्या नशेत भरधाव वेगात ट्रक चालवत चालकाने समोर चालणाऱ्या वाहनास मागून धडक दिली . यात वाहन फूटबॉल सारखे रस्त्याच्या कडेला कलंडले यात एक जण जखमी झाला असून वाहन पूर्ण चक्काचूर झाले हा अपघात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे .एम .एच 19 सी .वाय .4733 हे वाहन घेवुन योगेश राजकुमार तलरेजा रा . मणेश नगर जळगाव हा व सेल्समन सादीक गफ्फार पिंजारी वय ३८ रा . मेहरून जळगाव हे यावल कडे येत होते, तर मागुन दारूच्या नशेत ट्रक क्रमांक जी . जे . 31 टी . 3307 घेवुन धीरजसिंग रामजसिंग रा .चांदणी चौक भिलानी छत्तिसगड हा येत होतो दरम्यान चुंचाळे फाट्या जवळ मागुन त्याने तलरेजा यांच्या वाहनास धडक दिली व या धडकेत फुटबॉल प्रमाणे त्यांचे वाहन रस्त्याच्या कडेला कोसळले यात सेल्समन पिंजारी यांचा पायाला दुखापत झाली असुन अपघातानंतर ट्रक चालकांने पळ काढला मात्र , त्यास यावल शहरात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत