जिवराम नगरातील २९ वर्षीय विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
जिवराम नगरातील २९ वर्षीय विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
लेवाजगत न्यूज फैजपूर :- मसाका कारखान्या जवळील जिवराम नगरातील रहिवासी एका २९ वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार शनिवारी सकाळी निदर्शनास आला. मयत तरुणाचे नाव युवराज रवींद्र चव्हाण असे आहे. त्याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही.
फैजपूर पासून जवळच असलेल्या मधुकर सहकारी साखर कारखान्या जवळ जिवराम नगर आहे . या नगरात युवराज रवींद्र चव्हाण वय २९हा राहतो . शनीवारी सकाळी नऊ वाजता तो घरात एकटा असतांना त्याने राहत्या घराच्या छताच्या ऍंगलला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली . हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली . तेव्हा फैजपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश वंजारी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदना करीता यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये आणण्यात आला येथे डॉ . शुभम तिडके यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह कुटुंबीयांना सोपवला मयत युवराज चव्हाण यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही . याबाबत फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत