रंग प्रेमाचा.. 💕
रंग माझा सावळा
तुझ्या रंगी रंगला..
उधळून राधे, श्याम हा
तुझ्यात ग गुंतला..
म्हणसी मज छेडू नको
रंग तो उडवू नको..
प्रेमाचा चेहरा आता
नजरेत या बसला..
रंग हातात दोन्ही
अन धाव तुझ्याकडे..
लावण्यास रंग तुला
अट्टहास चालला..
लपशी मागे यशोदाईच्या
तक्रार माझी होईल..
हसत यशोदाईंचा
रंग तुलाही लागला..
रुसण्याचे नाटक मग
मनावने माझे चालू
रंगाचा डाव माझा
माझ्यावरच उलटला..
रंग लावता लावता
मीच रंगात रंगलो..
धुळवडीत सप्तरंगांच्या
रंग प्रेमाचा भरूनी गेला..
कवि अविम् ❣️
(अक्षय विजय मलमकार)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत