खा रक्षाताई खडसे यांची इंटर पार्लियामेंटरी युनियनच्या (IPU) इंडोनेशिया येथील १४४ व्या असेम्ब्लीसाठी निवड
खा रक्षाताई खडसे यांची इंटर पार्लियामेंटरी युनियनच्या (IPU) इंडोनेशिया येथील १४४ व्या असेम्ब्लीसाठी निवड
लेवाजगत न्यूज सावदा -इंडोनेशिया संसदेच्या आमंत्रणावरून “इंटर पार्लियामेंटरी युनियन (IPU)” ची १४४ वी असेम्ब्ली नुसा दुआ - बाली इंडोनेशिया येथे दिनांक २० ते २४ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेली असुन, सदर असेम्ब्लीसाठी लोकसभा अध्यक्ष श्री.ओम बिर्ला यांनी भारतातून जाणाऱ्या सहा खासदार यांच्या शिष्टमंडळात खासदार श्रीमती रक्षाताई खडसे ह्यांची निवड केली आहे.
भारतीय खासदारांच्या सदर शिष्टमंडळासह दि.१८ मार्च रोजी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे ह्या दिल्ली येथून देनपसार बाली इंडोनेशिया साठी निघणार आहेत. खासदार श्रीमती रक्षाताई खडसे ह्या इंटर पार्लियामेंटरी युनियन (IPU) च्या युथ पार्लामेंट मध्ये आशिया पॅसिफिक ग्रुपचे बोर्ड मेंबर म्हणुन गेल्या दोन वर्षापासून नेतृत्व करीत आहेत.२१ मार्च २०२२ रोजी होणाऱ्या आयपीयु गव्हर्निंग कौन्सिलला त्या भारतातील युवाबद्दल करण्यात आलेल्या घडामोडींचा लेखाजोखा व भविष्यात येणाऱ्या आव्हानांन बद्दल माहिती देऊन, उपाययोजना बाबत चर्चा करतील. तर आयपीयुच्या वूमन पार्लामेंट स्टँडिंग समितीच्या दोन पॅनलला भारतातर्फे संबोधित करणार आहेत. त्यात माहिती तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रातील उपयोग व येणाऱ्या अनेक समस्यांना सामोरे जाण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच देशवासीयांसाठी उपयोगात आणणाऱ्या चांगल्या पद्धतीची देवाणघेवाण हा विषय सुध्दा चर्चा करतील.
ह्या पुर्वी सुद्धा खासदार श्रीमती रक्षाताई खडसे ह्या सेंट पिटर्सबर्ग रशिया येथे झालेल्या १३७ व्या इंटर पार्लमेंटरी युनियनला*माजी लोकसभा अध्यक्षा श्रीमती सुमित्राताई महाजन अध्यक्षतेत भारताच्या शिष्टमंडळासह रशिया दौऱ्यावर गेल्या होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत