Header Ads

Header ADS

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत ऊर्वीप्रियाचे उज्वल यश.

 


राष्ट्रीय कराटे स्पर्धेत ऊर्वीप्रियाचे उज्वल यश.

 क्रीडा वृत्त लेवाजगत न्यूज,-उर्वीप्रिया चव्हाण हिने जे एस के गोजू आर वाय यू कराटे डी ओ इंडिया तर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन काटा आणि को बडो कराटे चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेत व्यक्तिगत सादरीकरण गटात प्रथम क्रमांक पटकावून (गोल्ड मेडल,) सुवर्णपदक पटकावले. हे सुवर्ण पदक आणि प्रशस्तीपत्र कराटे क्लासेसच्या कोच कोमल राठोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ऊर्वीप्रिया बलभीम चव्हाण हिला या यशासाठी पवन घुगे आणि कोमल राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.


यापूर्वीही उर्वीप्रिया बलभीम चव्हाण हिने मिशन मार्शल आर्ट आणि वाशु कुंकू स्पोर्ट्स कराटे असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेत भाग घेऊन मुकाबला कौशल्य नैपुण्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक आणि कौशल्य प्रदर्शन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला होता. तसेच आणखी एका राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत रौप्य पदक मिळविले होते. उर्वीप्रिया बलभीम चव्हाण ही इरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकत असून तिच्या या यशाबद्दल इरा इंटरनॅशनल स्कूलचे संचालक डॉ सतीश गोरे, प्राचार्या शर्मिष्ठा दत्ता आणि उपप्राचार्या रोहिणी देशपांडे, शिक्षक भाग्यश्री गावंडे अनिता शर्मा शुभांगी जमदाडे, भाग्यशाली पवार, अभिलाशा शिंदे आदींनी तिचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.