Header Ads

Header ADS

संपूर्ण महाराष्ट्रातून निवड होण्याचा पटकावला सन्मान तायक्वांडो साईं डिप्लोमा साठी निलेश जाधव यांची निवड

 



संपूर्ण महाराष्ट्रातून निवड होण्याचा पटकावला सन्मान

तायक्वांडो साईं डिप्लोमा साठी निलेश जाधव यांची निवड 

उरण (सुनिल ठाकूर ). सुभाषचंद्र राष्ट्रीय खेल प्राधिकरण ( Sports Authority of India ) यांच्या माध्यमातून एक वर्षाचा तायक्वांडो डिप्लोमा कोर्स चालविला जातो.या कोर्स मध्ये दिवसातून ८ ते १० तास तायक्वांडो व स्पोर्ट्स सायन्स चे प्रशिक्षण दिले जाते. या कोर्ससाठी निवड होणे हे कुठल्याही तायक्वांदो खेळाडूचे स्वप्न असते. रायगड जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव, 7 डिग्री ब्लॅक बेल्ट होल्डर सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारे निलेश जाधव यांची या अत्यंत प्रतिष्ठित अशा कोर्ससाठी निवड झाली आहे.

निलेश जाधव हा बंगलोर येथील साई सेंटर मध्ये एक वर्षाच्या तायक्वांडो डिप्लोमासाठी रवाना झाला आहे. या कोर्ससाठी निवड करताना देशभरातून हजारो खेळाडूंची परीक्षा घेतली जाते. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि देशपातळीवरील स्पर्धांच्यात सुवर्ण पदक पटकावणारे निलेश जाधव यांची या कोर्ससाठी निवड झाली आहे.

 विशेष उल्लेखनीय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून फक्त निलेश जाधव यांची निवड झाली आहे.निलेश जाधव हे मागील १५ वर्षांपासून सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तायक्वांडो प्रशिक्षण घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.