सावदा पोलिसांचे परिसरात रात्री कोबिंग ऑपरेशन एक संशयित ताब्यात वाहनांकडून ३५शे रुपये दंड वसूल
सावदा पोलिसांचे परिसरात रात्री कोबिंग ऑपरेशन
एक संशयित ताब्यात वाहनांकडून ३५शे रुपये दंड वसूल
लेवाजगत न्यूज सावदा- पोलीसांकडून चिनावल, वाघोदा, वडगाव, कोचुर, रोझोदा, सावखेडा,कळमोदा या गावातील परिसरामध्ये व शेती शिवरा मध्ये दिनांक१६ (बुधवार) च्या मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले.
यादरम्यान वडगाव येथील यासीन तडवी या संशयित आरोपीला मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी आठ पकड वारंट, नॉन बेलेबल, चार बेलेबल आरोपी व १२ समज बजावल्या असून मुंबई ॲकट १२२ प्रमाणे सूर्यास्त पासून ते सूर्योदयापर्यंत संशयित फिरत असलेल्या वडगाव येथील संशयित आरोपीला यासीन तडवी याला मोठा वाघोदा येथे मध्यरात्री अटक करण्यात आली. मध्यरात्री नाकाबंदी करून अकरा वाहनांकडून ३५ ००रुपये दंड तर ३५ वाहनांची, एक लॉज, चार हॉटेल ,चार हिस्ट्रीसीटर यांचीदेखील तपासणी करण्यात आली.
दरम्यान गेल्या महिन्याभरापासून चिनावल परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी सामग्री व शेतमालाच्या नुकसानी संदर्भात शेतकर्यांमध्ये मोठे संतप्त वातावरण होते. त्यामुळे सावदा पोलिस आता ॲक्शन मोडमध्ये आले असून संशयित असणाऱ्या प्रत्येकाची झाडाझडती घेऊन आरोपीचा बंदोबस्त व्हावा यानिमित्ताने पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत आहे. कोम्बिंग ऑपरेशन राबवत असताना पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार सावदा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले, निंभोरा पोलीस ठाण्याचे च प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड, पोलीस नाईक मेहमूद शहा ,उमेश पाटील, विनोद पाटील, पांडुरंग सपकाळे यांनी कामगिरी बजावली.
चिनावल येथे बंदोबस्तासाठी दहा पोलिस कर्मचारी, आर सी बी प्लाटून ,दहा होमगार्ड व सावदा पोलिस ठाण्याचे पाच कर्मचारी हे बंदोबस्तासाठी तैनात आहेत दरम्यान यावेळी कुणीही संशयित व्यक्ती शेतशिवारात फिरत असल्यास तत्काळ सावदा पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील एपीआय देविदास इंगोले यांनी केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत