एकीकडे चोरांचा शोध होता सुरू, दुसरी कडे झाली चोरी. यावलचे माजी नगराध्यक्षांच्या शेतातुन २१ पोती तुरं अज्ञात चोरट्यांनी लांबवली,
एकीकडे चोरांचा शोध होता सुरू, दुसरी कडे झाली चोरी.
यावलचे माजी नगराध्यक्षांच्या शेतातुन २१ पोती तुरं अज्ञात चोरट्यांनी लांबवली,
लेवाजगत न्यूज यावल :-शहराचे माजी नगराध्यक्ष यांच्या शेतातील गोदामातुन तुरीचे २१ पोते अज्ञात चोरट्यांनी लांबवले ही घटना मंगळवारी रात्री घडली असुन विशेष म्हणजे याचं शिवाराला लागुन असलेल्या शिवारात रात्री शेत विहिरीतील केवल चोरी करणारे अज्ञात चोरटे दिसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी व पोलिसांची वर्दळ होती. तर दुसरी कडे चोरट्यांनी पोते लांबवले.
शहराचे माजी नगराध्यक्ष दिपक बेहेडे यांचे वढोदा शिवारात अंकलेश्वर – बऱ्हाणपूर राज्य मार्गालालगत शेत आहे या शेतात गोदाम आहे या गोदामात त्यांनी धान्य साठवण करून ठेवले होते तेव्हा मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गोदामातील तुरीचे २१पोते लांबवले हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला असुन प्रत्येकी ६५ किलो तुर एका पोत्यात होती व बाजार भावा प्रमाणे ६८ हजार २५० रूपयांची तुरं चोरीस गेली आहे. चोरट्यांनी शेजारच्या शेतातील केळी बाग मधुन तुरीचे पोते वाहतुक करीत एका वाहनातुन लांबवल्याचे निर्दशनास येत आहे तर याचं गोदामात प्रत्येकी ५० किलो वजनाचे ७ पोते गहु होते त्यांना चोरट्यांनी हात लावला नाही.तर या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.
तुम मुझे वहॉ धुंड रहे हो.. ..
अमिताभ बच्चनच्या दिवार सिनेमातील संवाद सारखी परिस्थिती या चोरीच्या घटनेतुन समोर आली महाराणा प्रताप नगरातील प्रदिप पाटील यांना मंगळवारी रात्री कोरपावली जुन्या रस्त्यावरील शेत शिवारात शेत विहिरीतील केबल चोरणारे काही अज्ञात चोरटे दिसले व त्यांना पोलिसांसह शेतकऱ्यांना माहिती दिली रात्री १० वाजे पासुन ते मध्यरात्री २वाजे पर्यंत विरावली,कोरपावली शिवारात मोठया प्रमाणात पोलिस व शेतकऱ्यांची वर्दळ होती व लगतच्या वढोदा शिवारात चोरी झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत