थकीत वीज बिल एकरकमी भरल्यास व्याज, विलंब आकार १०० टक्के माफ होणार हजारो कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना
थकीत वीज बिल एकरकमी भरल्यास व्याज, विलंब आकार १०० टक्के माफ होणार
हजारो कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना
वृत्त संस्था बुलढाणा-वीज बिलाची थकबाकी एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने १ मार्चपासून विलासराव देशमुख अभय योजना सुरू केली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत योजना राहील, अशी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली.
लोणार येथे विश्रामगृहाच्या आवारात महावितरणच्या वतीने मंगळवारी वीज ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. हजारो कोटींची थकबाकी पूर्ण वसूल करणे कठीण असल्याने ही योजना लागू केली जात असल्याचे ते म्हणाले. राज्यात ३ कोटी ग्राहक आहेत.
वाढता वाढे थकबाकी
३२ लाख १६ हजार ५००: कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची संख्या डिसेंबर २०२१ अखेर.
७ हजार ७१६ कोटी रुपये: वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांकडील थकबाकी.
९ हजार ३५४ कोटी रुपये : फ्रँचायझी असलेल्या भागासह कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांकडील थकबाकीची रक्कम. यात मूळ थकबाकी ६ हजार २६१ कोटी रुपये.
अशी असेल योजना
• योजनेचा कालावधी : १ मार्च २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२. कृषी ग्राहक वगळून इतर सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू.
• ग्राहकांना थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरावी लागेल. थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येईल.
• मूळ मुद्दलाची रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना ५% व लघुदाब ग्राहकांना १०% अधिकची सवलत,
• रक्कम सुलभ हप्त्यांने भरावयाची असल्यास मुद्दलाच्या ३० टक्के रक्कम एकरकमी भरणे आवश्यक. यानंतरच त्यांना उर्वरित रक्कम ६ हप्त्यात भरता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत