बारावीच्या परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर
बारावीच्या परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर
लेवाजगत न्यूज सावदा- येथील श्री.आ.गं. हायस्कूल व ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे
इयत्ता 12 वी च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्र क्रमांक 0875 येथून परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, यापरीक्षा केंद्रावर एकूण 288 विद्यार्थ्याची बैठक व्यवथा करण्यात आली असून, श्री. आ.गं. हायस्कूल च्या श्री. ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयच्या इमारतीमध्ये दालन क्रमांक ०1ते 12 मध्ये बैठकव्यवस्था करण्यात आली असून शास्त्र शाखेच्या क्रमांक S0070702 पासून S070859, कला शाखेच्या S132192 पासून S132321, अशी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे, त्याच प्रमाणे कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत प्रत्येक शाळेत परीक्षा केंद्र असल्यामुळे सावदा केंद्राला संलग्न असलेल्या मस्कावदयेथील श्री. वा. कृ. पाटील विद्यालय आणि थोरगव्हाणयेथील श्री. डि एस. देशमुख हायस्कूल येथे उपकेंद्र असल्यामुळे त्याठिकाणी त्या स्थानिक विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्या आली आहे. याची संबंधित विद्यार्थी, पालक यांनी नोंद घ्यावी, असे केंद्रसंचालक सी.सी. सपकाळे यांनी कळविले आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत