Header Ads

Header ADS

वडगाव शेती शिवारात चोरट्यांनी डी.पी.फोडली निभोरा , सावदा पोलिस अधिकाऱ्यांची घटना स्थळी धाव , श्वान पथकात कडून चाचपणी

 



वडगाव शेती शिवारात चोरट्यांनी डी.पी.फोडली 

निभोरा , सावदा पोलिस अधिकाऱ्यांची घटना स्थळी धाव ,

श्वान पथकात कडून चाचपणी 

लेवाजगत न्यूज चिनावल ता रावेर - गेल्या महिनाभरापासून चिनावल, वडगाव ,सावखेडा व  कुंभार खेडा व परिसरात शेतकऱ्यांच्या पिक चोरी व शेती उपयोगी साहित्याची नुकसान व चोरी चे सत्र सुरूच आहे आज पुन्हा वडगाव शिवारात चोरट्यांनी विजेची डी.पी.चोरी च्या विचाराने फोडून नुकसान केल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

        चिनावल उटखेडा रस्त्यावरील सुकी नदी पार असलेल्या वडगाव शिवारात चिनावल येथील राहवाशी शेतकरी श्रीकांत सिताराम सरोदे यांच्या शेतात असलेल्या महावितरण वीज कंपनी चे १०० अम्पीअर ची  डी.पी दि १७ चे रात्री चोरट्यांनी भर वाहतूक च्या रस्त्यावरील फोडून नुकसान व खाली फेकून दिल्याची घटना दि १८ रोजी सकाळी उघडकीस आली घटना लक्षात येताच चिनावल व  वडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेतली आणि  तात्काळ निभोरा व सावदा पोलिसांना शेतकरी श्रीकांत सरोदे यांनी कळवली,लगेच  घटनास्थळी निभोरा पोलिस ठाण्याचे सपोनि गणेश धुमाळ , सावदा पोलिस ठाण्याचे  सपोनि देविदास इंगोले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

   प्राथमिक चौकशी करीत जळगाव येथील श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले श्वान पथकातील "  चॅम्प  " या श्वानाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. या वेळी महावितरण कंपनी चे विशाल किनगे व त्यांचे कर्मचारी यांना घटनास्थळी बोलवून निभोरा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. घटनास्थळी शेतकरी श्रीकांत सरोदे , शरद बोंडे , ठकसेन पाटील , गोपाळ नेमाडे , राहुल भंगाळे , राहुल टोके ,डिगा महाजन , अमोल महाजन , सुहास सरोदे पो.पा निलेश नेमाडे , वडगाव पो.पा.सजय वाघोदे , सरपंच धनराज पाटील ,चिनावल माजी सरपंच योगेश बोरोले , दामोदर महाजन , विकास बोंडे , संदिप महाजन , दिनेश महाजन , योगेश भंगाळे , राजेंद्र पाटील , यांचे सह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते तर श्वान पथकातील विनोद चव्हाण , भावसार , सावदा पो स्टेशन चे संजीव चौधरी , मजहर तडवी ,निभोरा पोलिस स्टेशन चे राका पाटील होमगार्ड अनिल तडवी यांनी घटनास्थळाची पाह ती केली निभोरा पोलिस ठाण्याचे सपोनि गणेश धुमाळ , सावदा पोलिस ठाण्याचे सपोनि देविदास इंगोले यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.