Header Ads

Header ADS

माझ्याशी मैत्री कर , मी तुला खुश ठेवीन असे सांगत सांगवी बुद्रुक येथील २० वर्षीय विवाहितेचा विनयभंग

 


माझ्याशी मैत्री कर , मी तुला खुश ठेवीन असे सांगत सांगवी बुद्रुक येथील २० वर्षीय विवाहितेचा विनयभंग 

लेवाजगत न्यूज यावल :- तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील एका २० वर्षीय विवाहितेचा एकाने विनयभंग केला या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

    सांगवी बुद्रुक ता . यावल येथील पिडीत २० वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादी नुसार ती व तिची नणंद मंगळवारी सकाळी ११ वाजेला गावातील हौदावर धुणे धुत असतांना जहांगीर तडवी रा . बोरखेडा ता . यावल हा तिच्याजवळ आला व तिला दम देवुन तिचा मोबाईल नंबर घेवुन हौदापासुन ते घरापावेतो पाठलाग केला व तु माझ्या सोबत मैत्री कर तु मला आवडली आहे . मी तुला खुश ठेवीन असे बोलुन मोबाईलवर फोन करुन तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. 

     हा प्रकार पिडीतने आपल्या पतीसह कुटुंबास सांगीतला व रात्री उशीरा यावल पोलिसात जहांगीर तडवी यांच्या विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हवालदार अशोक जवरे करीत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.