पोलिसांनी खाजगी वाहनावर पोलीस पाटी लावल्यास होणार कार्यवाही
पोलिसांनी खाजगी वाहनावर पोलीस पाटी लावल्यास होणार कार्यवाही
लेवाजगत न्यूज मुंबई- पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या खासगी चारचाकी वाहनांवर पोलीस अशी लाल रंगाची पाटी लावणे , पोलिस लिहिणे किंवा पोलिसांचा लोगो लावणे आता महागात पडणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस सह- आयुक्त राजवर्धन यांनी पुढील चार दिवसांत खाजगी वाहनांवरील ‘पोलीस’ नावाची पाटी काढण्याचे आदेश सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिले आहेत. अन्यथा शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.Disciplinary action will be taken if the police put ‘Police’ sign on a private vehicle
बहुतेक पोलीस अधिकारी, अंमलदार, त्यांचे नातेवाईक खासगी वाहनावर पोलीस अशी लाल रंगाची पाटी लावून त्यांचे वाहन चालवतात, अशा तक्रारी मुंबई वाहतूक शाखेकडे प्राप्त झाल्या आहेत. Such complaints have been received by the Mumbai Transport Branch मात्र, अशा प्रकारे पोलीस पाटील लावून खासगी वाहन चालविण्यात येत असल्याबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून कारवाईचे निर्देशही दिले आहेत. सर्व नागरिकांना समान कायदा, यानुसार पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन करणे हे पोलिसांची प्रतिमा मलिन करणारे आहे. तसेच, अशी पोलीस पाटी असल्याने अनेकदा ही वाहने नाकाबंदी किंवा तपासणी नाक्यावर चेक न करताच पाठवली जाण्याची शक्यता असेत. त्यामुळे, नागरिकांच्या जीवाला धोका असून घातपाताचीही शक्यता नाकारता येत नाही, असे मुंबईच्या सह आयुक्तांनी जारी केलेल्या एका पत्रात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत