Header Ads

Header ADS

फैजपूर धनाजी नाना महाविद्यालयाच्या रुटवरील बससेवा सुरू करण्या संदर्भात प्राचार्यांना सकाळ यिन चे निवेदन

 फैजपूर धनाजी नाना महाविद्यालयाच्या रुटवरील बससेवा सुरू करण्या संदर्भात प्राचार्यांना सकाळ यिन चे निवेदन                      आमच्या महाविद्यालयाच्या रुट वरील बससेवा पूर्वरत सुरू करा

सावदा प्रतिनिधी:- शैक्षणिक वर्ष २०२१-२२ द्वितीय सत्र दिनांक 1 फेब्रुवारी २०२२ पासून नियमितपणे ऑफलाईन सुरू झालेले आहे. मात्र सध्यस्थितीत एस.टी महामंडळाची बससेवा संपामुळे १०० टक्के सुरु झाली नाही त्यामुळे रावेर- यावल तालुक्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थित राहता येत नाही. अनुउपस्थितीमुळे  विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे व परिणामी विद्यार्थ्यांवर अतिरिक्त मानसिक तणाव येतं असल्याचे दिसून येत आहे हि बाब पालकांच्या लक्षात येत असून काही पालक उपलब्ध वाहनातून त्यांच्या पाल्यांना महाविद्यायापर्यंत सोडण्यास व घेण्यास येतात. त्यामुळे पालकांना अतिरिक्त आर्थिक भृदंड सहन करावा लागत आहे.

तरी आपण या प्रश्नावर जातीने लक्ष देऊन भारताचे उज्वल भविष्य ज्यांच्या समर्थ खांद्यावर आहे त्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा व महाविद्यालय रूट वरील सर्व बससेवा पुर्वरत सुरू कराव्यात ही नम्र विनंती आपण आमच्या विनंती अर्जाचा सकारात्मक विचार करून पुढील निर्णय घ्याल हिच अपेक्षा. 

    अशा प्रकारचे निवेदन धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी सर यांना सकाळ यिन तर्फे देण्यात आले. यावेळी यिन अध्यक्ष गौरव आर महाजन, प्रेम चौधरी, छाया बऱ्हाटे, लीना पाटील, वैभव महाजन, भुषण तायडे, निलेश महाजन, हर्षल महाजन, विशाल महाजन, शितल चौधरी, ऋषिकेश जव्हरे, अनिस मण्यार, आकाश पाटील, हर्षिका पाटील, आकाश महाजन, अतुल पाटील व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.