आमोदा येथे दिड लाखाचे शेती उपयोगी साहित्य जळून खाक
आमोदा येथे दिड लाखाचे शेती उपयोगी साहित्य जळून खाक
लेवाजगत न्यूज आमोदे -येथे दिनांक ११ जून 2022 रोजी दुपारी साडेबारा ते एक च्या सुमारास आग लागून सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की आमोदा पाडळसा जुना रोड जवळील दोन शेतकऱ्यांच्या खळ्याला लागलेल्या आगीत ठिबक नळ्या, पीव्हीसी पाईप,गुरांचा चारा, लाकूड जळून खाक झाले. फैजपूर व सावदा येथील अग्नीशामक दलाचे कर्मचारी व गावकऱ्यांनी दोन तास झुंज देऊन ही आग विझवली
आमोदा येथील शेतकरी भागवत दामोदर पाटील व शरद पोपट पाटील यांचे खळे असून त्यांच्या खड्याला दिनांक११ जून २०२२ रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटं ते १ वाजेच्या सुमारास अचानकआग लागून भागवत पाटील यांचे १२५ नग पी. व्ही सी पाईप, ठिबक नळ्यांचे बंडल, गुरांचा चारा तसेच शेजारील शरद पोपट पाटील यांच्या गुरांची कडबा कुट्टी चारा व लाकूड जळून खाक झाले. मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे शेजारी दोन म्हशी बांधलेल्या होत्या त्यांचे दोर तोडून सुटका करण्यात आली. त्यामुळे प्राणहानी टळली आग विझवण्या कामी सावदा व फैजपूर अग्निशामक बंब व गावकऱ्यांनी आगीशी दोन तास झुंज देऊन आज विझवली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत