Header Ads

Header ADS

भारत-चीन सीमेवर तैनात जवान १४ दिवसांपासून बेपत्ता; सुरक्षा दलांकडून शोध सुरु

 भारत-चीन सीमेवर तैनात जवान १४ दिवसांपासून बेपत्ता; सुरक्षा दलांकडून शोध सुरु

लेवाजगत न्युज:-अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर तैनात असलेला डेहराडूनचा रहिवासी लष्करी जवान गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता आहे. २९ मे रोजी प्रकाशसिंग राणा बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी राणाच्या पत्नीला दूरध्वनीवरून याची माहिती दिली होती. मूळचा रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठचा रहिवासी असलेला राणा हा ७ व्या गढवाल रायफल्सचा शिपाई असून तो अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर थकाला पोस्टवर तैनात होता.


 

बेपत्ता जवानाची माहिती केंद्रीय मंत्र्यांना पाठवली


राणा गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता आहे, त्यामुळे त्याची पत्नी ममता आणि दोन मुले अनुज (१०) आणि अनामिका (७) यांच्यासह संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) सहसपूरचे आमदार सहदेव सिंह पुंडिर यांनी शुक्रवारी येथील सैनिक कॉलनीतील राणा यांच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेतली. पुंडिर यांनी ‘पीटीआशी बोलताना सांगितले की, मी याबाबत संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्याशी बोललो असून, त्यांनी मला राणांचा शोध घेऊ, असे आश्वासन दिले आहे. बेपत्ता जवानाची माहिती केंद्रीय मंत्र्यांना पाठवली असल्याचेही पुंडिर म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.