कंत्राटी महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन करणं भोवलं ! महावितरणच्या व्यवस्थापकासह लिपिक निलंबित
कंत्राटी महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन करणं भोवलं ! महावितरणच्या व्यवस्थापकासह लिपिक निलंबित
लेवाजगत न्यूज जळगाव : महावितरण मध्ये कंत्राटी तत्त्वावर सेवेत असलेल्या महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन करणं महावितरणच्या मानव संसाधन विभागाच्या व्यवस्थापकासह निम्नस्तर लिपिकाला चांगलंच भोवलं आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर महावितरणच्या कार्यकारी संचालकांनी दोघांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
उद्धव रामभाऊ कडवे ( व्यवस्थापक ) आणि राजेंद्र निळकंठ अमोदकर ( निम्नस्तर लिपिक ) अशी निलंबित झालेल्या दोघांची नावे आहेत. विशाखा समितीकडे तक्रार करुनही त्याची दखल न घेतल्याने पीडितेने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. त्यानुसार दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान , याप्रकरणी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी देखील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
या तक्रारिंच्या अनुषंगाने महावितरणचे मानव संसाधन विभागाचे मुंबई येथील कार्यकारी संचालक अरविंद भादीकर यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत. हे आदेश जळगाव मंडळ कार्यालयाला नुकतेच प्राप्त झाले.
महावितरणच्या जळगाव मंडळ कार्यालयातील मानव संसाधन विभागाचा व्यवस्थापक उद्धव कडवे याने कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला असलेल्या तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. तर लिपिक राजेंद्र अमोदकर यानेही तरुणीशी अश्लील कार्यालयाच्या आहेत. इन्फोकामगार संघटनांकडून कडवे यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे महावितरणच्या विविध कामगार संघटनांच्या कृती समितीने देखील दोन दिवसांपूर्वी मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत