तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ
तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ
लेवाजगत न्यूज जळगाव: दहावीचा निकाल अजूनही लागायचा आहे. पण, पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दहावीचा निकाल लागण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्ज करता येऊ शकणार आहे. ३० जून ही अंतिम मुदत असणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे.
पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेला २ जूनपासून सुरुवात झाली आहे. २ ते ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. याच काळात विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करावयाच्या आहेत. त्यासोबत प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरण्याची निश्चितीसुध्दा विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.
३ जुलै रोजी विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ४ ते ६ जुलै या काळात विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीसंदर्भात तक्रारी नोंदविता येतील. नंतर ७ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना गमावले आहे. अशा विद्यार्थ्यासाठी पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये दोन जागा राखीव असणार आहेत. दरम्यान, अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राज्य सरकारकडून पन्नास हजार रुपये खर्च केले जातील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत