Header Ads

Header ADS

खिरोदा येथे विजेच्या धक्याने बालकाचा मृत्यू

 

Death of a child due to electric shock at Khiroda

खिरोदा येथे विजेच्या धक्याने बालकाचा मृत्यू  

 सावदा प्रतिनिधी -बुधवार दुपारी वादळी वाऱ्यामुळे तुटून पडलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागल्याने खिरोदा येथे एका बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. रावेर तालुक्यातील बऱ्याच परिसराला काल सायंकाळी वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला. दरम्यान , आज सकाळी खिरोदा येथील बाहेरपुरा भागातील रहिवासी असणाऱ्या अफसर अजित तडवी याच पाच वर्षाच्या बालकाचा विजेच्या धक्क्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली.

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLWdiCC6n84WLke_9_gumkgWItJO_DdCz0gtioD6GnxsYLgnOxi74qibGwZpukluuPZ-bUi0zzwr7JjEvNkWbPQV5EpPAWlRdyAdw-l_bnXVCNLpxk2N0ZoQaLbHJgH4PyFAE1lchAXryATZMfiKbDA4=w576-h1024-no?authuser

काल वादळात पडलेल्या तारांना त्याचा स्पर्श झाल्याने या चिमुकल्याला प्राण गमवावा लागल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान  या प्रकरणी सावदा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. तर , महावितरणने तातडीने खाली पडलेल्या तसेच लोंबकणाऱ्या तारांची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.